HW News Marathi
महाराष्ट्र

HW Impact : बुलढाण्यातील ‘विषारी पाण्याच्या गावाची’ प्रशासनाने घेतली दखल

शिवाजी मामणकर | काही दिवसापूर्वी एचडब्लू मराठीने एक विदारक सत्य महाराष्ट्रासमोर मंडळ होत. बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात गेल्या काही महिन्यात तब्बल ३०० जणांना किडनीच्या आजाराने आपला जीव गमवावा लागला होता. तर येथील जवळपास १४ लाख ८ हजार लोक या आजाराने त्रस्त आहेत आणि ८०० लोक डायलिसिसवर आहेत. या सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये पिण्याच्या पाण्यातील टीडीएसच वाढलेले प्रमाण पाहायल मिळाले आहे. टीडीएसचे सर्वसाधारण प्रमाण ३०० टीडीएस असेल तर ते पाणी पिण्यायोग्य असते. परंतु बुलढाण्यातील गावांमध्ये हे प्रमाण जवळजवळ १२०० टीडीएसपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीची किडनी निकामी झाली आहे .

बुलढाणा जिल्ह्यातील नेमकी ही परिस्थिती काय आहे. या गावची व्यथा जाणून घेण्यासाठी एच.डब्ल्यू. मराठीने एक स्पेशल रिपोर्ट केला होता. या रिपोर्टीच दखल शासन दरबारी घेतली म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्वत: या बातमीची दखल घेऊन प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. जाधव यांनी स्वतः एचडब्लूच्या प्रतिनिधींना बोलावून यासंबंधी माहिती दिली आहे. “खारपाण पटट्यात डायलिसिस सेंटर उभारण्याची केंद्राकडे मागणी”,त्यांनी आरोग्य मंत्रालयाकडे शिफारस करून यासंबंधी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर जनशक्ती मंत्र्यालायातर्फे या गावांमध्ये डायलिसिस सेन्टर आणि क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठीची उपकरण बसवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. जाधव यांनी संसदेत सुद्धा हा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे एच.डब्लू मराठी प्रशासनाचे त्याचबरोरब जाधव यांचेही आभार मानतो. यापुढे बुलढाणा जिल्याहीत लोकांचा विषारी पाण्याचा प्रश्न सुटून त्यांची पुढची पिढी ही निरोगी आणि सुदृढ होईल हीच अपेक्षा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा पहिला बळी, मुंबईत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

swarit

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक होणार तिरंगी, पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला चर्चेतून काढता पाय

News Desk

वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू, शेताच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

News Desk