मुंबई | ‘कोरोना’मुळे पोलीस दलातील तिसरा बळी गेला आहे. कुर्ला वाहतूक पोलीस विभागातील ५६ वर्षीय हेडकॉन्स्टेबल शिवाजी सोनावणे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. केईएम रुग्णालयात आज (२७ एप्रिल) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी वाकोला पोसीस ठाण्यात कार्यरत एका ५७ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा तर त्यापूर्वी एका ५३ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस दलात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि होणारे मृत्यू यामुळे आता चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
Mumbai Police regrets to inform about the unfortunate demise of HC Shivaji Narayan Sonawane (56) from Kurla Traffic Division. HC Sonawane had been battling Coronavirus.
We pray for his soul to rest in peace. Our thoughts and prayers are with the Sonawane family.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 27, 2020
संतापजनक ! उपचारांसाठी अनेक रुग्णालयांकडून नकार
हेडकॉन्स्टेबल शिवाजी सोनावणे यांची उपचारादरम्यान मोठी हेळसांड झाल्याचे देखील समोर आले आहे. २० एप्रिल रोजी ताप आल्याने ते खाजगी दवाखान्यात गेले. मात्र, त्यानंतर ते उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात गेले तर तिथून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. कस्तुरबा रुग्णालयाने बेड उपलब्ध नसल्याचे कारण देऊन त्यांना नायर रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, तिथे गेल्यानंतर नायर रुग्णालयानेही त्यांना बेड उपलब्ध नसल्याचेच कारण देऊन केईएममध्ये जाण्यास सांगितले. केईएम रुग्णालयातही त्यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. मात्र, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ओळखीने अखेर त्यांना केईएममध्ये दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचाराला सुरूवात झाली. मात्र, सोमवारी (२७ एप्रिल) उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.