HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध! – अजित पवार

पुणे। पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महानगरासह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे शहरातील हडपसर येथे कै. महादेवराव (आप्पासाहेब) बडदे उद्यान लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, वैशाली बनकर, बापूसाहेब बडदे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासोबत मानवी जीवनमान उंचावण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, आणि त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नव करण्यात येत आहेत. त्यासाठी राज्यात दळणवळणला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

कोरोना काळातही राज्य शासनाने विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी या काळातही विशेष प्रयत्न करण्यात आले. शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने करावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रताप सरनाईकांवर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

फडणवीसांना पंकजा मुंडे म्हणतात, आनंद आहे!

News Desk

“आज, उद्या वाट बघू नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू!”,पडळकरांचा सरकारला इशारा

News Desk