HW News Marathi
Covid-19

आपली योग्यता काय ? आपण बोलतो काय ?, अजित पवारांनी पडळकरांना सुनावले

सातारा | भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर खळबळजनक टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण पेटले. याच पार्श्वभूमीवर, आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आपली योग्यता काय ? आपण बोलतो काय ? यापेक्षाही महत्त्वाचे आपण कुणाबद्दल बोलतोय ? सूर्यावर थुंकले कि थुंकी आपल्याच तोंडावर उडते”, असे म्हणत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना बोचरा टोला लगावला आहे. शरद पवार आणि अजित पवार हे आज (२७ जून) साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर दुपारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांवर सणसणीत टीका केली आहे. “आपली पात्रता पाहून बोलावं. ज्यांची लायकी नाही अशांनी बोलणं योग्य नाही. समाजात केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. एखाद्याला नको तेवढे मोठे केले कि हे परिणाम होतात. बारामतीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहेच”, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर केली आहे.

“संपूर्ण देश शरद पवारांना ओळखतो. स्वतः पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे. कोणतेही संकट आले तरीही ते शांत बसून राहत नाहीत. संकट काळातही ते सतत काम करत असतात. या वयातही दौरे करून लोकांच्या भेटीगाठी घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. शरद पवारांचा शब्द कधी बदलला नाही. मात्र, तरीही काही लोक निव्वळ प्रसिद्धीसाठी त्यांच्यावर टीका करतात. मात्र, आता याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने कायदा आपले काम करेलच”, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर ?

काहीच दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत खळबळजनक टीका केली आहे. “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत असूनही कायमच त्यांची भूमिका राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची राहिलेली आहे. ते पुढेही हीच भूमिका कायम ठेवतील”, अशी अत्यंत टोकाची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

News Desk

सोनू सूदने पोलिसांना दिले २५,००० फेस शिल्ड, गृहमंत्र्यांनी मानले आभार !

News Desk

२ किमीच्या परिघातच संचाराची अट रद्द, घराजवळ खरेदी करण्याचे पोलिसांचे आवाहन

News Desk