HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाशी लढण्यासाठी हनुमानासारखा पर्वत उचलू नका ,घरात थांबा! अजित पवारांचं आवाहन

मुंबई | लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचे वर्णन रामायणात आहे. आज जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असे सांगून हनुमान जयंतीला, उद्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (७ एप्रिल) केले आहे. मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनासंसर्गाची साखळी तोडणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचे आज एकमेव कर्तव्ये आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणे, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणे, कोरोनाला प्रसाराची संधी न देणे आणि कोरोनाची साखळी तोडणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातेच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवले पाहिजे.

शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदीआदेश जारी केले आहेत. बंदीआदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकले जाईल. कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोनाप्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रामुळे भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख’ – अजित पवार

News Desk

भाजप आमदाराने घेतले नियम डावलून व्हीआयपी दर्शन

News Desk

दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप! भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक

News Desk