HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन; पूरस्थितीची आज पाहणी करणार

नागपूर । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काल नागपूर येथे रात्री साडेआठच्या सुमारास आगमन झाले. फडणवीस आज (१९ जुलै) वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करतील.

नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी , नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. आमदार कृष्णा खोपडे यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस आज वर्धा आणि चंद्रपुर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नागपूर येथे यासंदर्भात विभागस्तरीय आढावा बैठक घेतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Aprna

कोल्हापुराच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

News Desk

महाराष्ट्रात अजून 25 -30 वर्ष भाजपची सत्ता येणार नाही; संजय राऊतांचा दावा

News Desk