HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या मनधरणीसाठी देशमुखांनी २ कोटी मागितले!

मुंबई। शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते, असा खुलासा सचिन वाझेने ईडीकडे केला आहे. शरद पवारांनी वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध केला होता. यावर अनिल देशमुखांनी पवारांना राजी करण्यासाठी पैसे मागितले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला शरद पवारांना मनवण्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यास सांगितले होते. वाझेने पैसे भरण्यात असमर्थता दाखवल्यानंतर देशमुखांनी ते वेळेवर देण्यास सांगितले होते, असा दावा वाझेने केला आहे. ईडीने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे उघडकीस आले आहे.

४० कोटी रुपये घेण्यात आले होते

सचिन वाझे पुढे म्हणाले की, जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १० पोलीस उपायुक्तांच्या (डीसीपी) बदली आणि नियुक्तीचे आदेश जारी केले होते. या आदेशांवर मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब खूश नव्हते आणि त्यांनी आदेश माघारी घेतला होता. तीन ते चार दिवसांनंतर मला कळले की पैसे आणि इतर काही तडजोडींनंतर हा आदेश जारी करण्यात आला होता. या पोलीस अधिकार्‍यांकडून एकूण ४० कोटी रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी २० कोटी रुपये संजीव पलांडे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना तर, २० कोटी आरटीओ अधिकारी बजरंग करमाटे यांच्यामार्फत अनिल परब यांना देण्यात आले होते.अनिल देशमुख सचिन वाझेला त्यांच्या कार्यालय, घरी, राज्य अतिथीगृहात बोलावून विविध प्रकरणांच्या संदर्भात थेट निर्देश किंवा सूचना देत असत. सोशल मीडिया बनावट फॉलोअर केस सारख्या काही प्रकरणांमध्ये तर अनिल देशमुख स्वतःच निर्देश द्यायचे, असेही वाझेनी सांगितले.

बार आणि रेस्टॉरंटची यादी देण्यात आली

अनिल देशमुख यांनी प्रत्येक बारमालकाकडून ३ लाख रुपये गोळा करण्याचे आदेश देत १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी देण्यात आली होती, असेही वाझेने सांगितले. वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ४.७ कोटी रुपये गोळा केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात अनिल देशमुख यांनी मला त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून माझ्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर फोन केला आणि मला आजपर्यंत गोळा केलेली रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या.

अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत

देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी ही छापेमारी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसेच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे टाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, एनआयटी कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली. अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी धाडी टाकून चौकशी सुरू केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रेकिंग! मॉलमधील राड्याप्रकरणी अखेर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

Manasi Devkar

राज्यात आज 4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk

जावई या नात्याने डोबिंवलीकडे लक्ष द्या…

swarit