HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सत्ताधारी असूनही शिवसेना विरोधकांसारखी आंदोलनाची भाषा करते !

मुंबई | शिवसेना बुधवारी (१७ जुलै) पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार असल्याची घोषणा काहीच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शेतकऱ्यांसाठीच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “महाराष्ट्रात २०१४ सालापासून शिवसेना भाजपचे सरकार असूनही शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखी शिवसेनेला आंदोलने करण्याची भाषा करावी लागते. शेतकऱ्यांसाठी ही मोर्चा काढण्याची भाषा म्हणजे केवळ शिवसेनेची नौटंकी आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

“शिवसेना येत्या १७ जुलैला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असून मोर्चा शेतकऱ्यांंचा नव्हे तर शेतकऱ्यांंसाठी असणार आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काहीही बोलत नाही आणि बाहेर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात. सत्ताधारी पक्षाने लोकांच्या समस्या सोडविणे अपेक्षित असते. मात्र, शिवसेनेचे सरकारमध्ये काही चालत नाही”, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related posts

राज्यात ७ जागांसाठी आज मतदान, दिग्गजांचे भवितव्य होणार सीलबंद

News Desk

आम्ही कमळाच्या चिन्हावर लढलो तरीही भाजपमध्ये गेलेलो नाही !

News Desk

देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू | अमित शहा

News Desk