HW News Marathi
महाराष्ट्र

रस्त्यांच्या माध्यमातून विकास वेगाने पूर्णत्वाला | एकनाथ शिंदे

राज्यात बांधकाम मंत्री असतांना नितीन गडकरी यांनी रस्ते विकास महामंडळाची निर्मिती करून अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. त्यामध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेस वे , मुंबईतील उड्डाण पूल यांच्यासह विविध प्रकल्पांचासमावेश आहे. राज्य आणि देशाचा विकास रस्त्यांच्या माध्यमातून वेगाने पूर्णत्वाला जातो. म्हणून हा राज्यातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

रस्ते विकास महामंडळाकडे केंद्रीय बांधकाम मंत्रालयाने जवळपास ३ हजार कि.मी लांबीच्या रस्त्याचे काम दिले आहे, ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण अतिशय जबाबदारीने काम करू असा विश्वास देतअसल्याचेही ते म्हणाले. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ॲण्ड हायवेजच्या वतीने सोमवारी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी आणि अभियंत्यांचा सत्कार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्तेकरण्यात आला त्यावेळी शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिेंदे, राज्यमंत्री मदन येरावार, प्रधान सचिव अशिष सिंह, रस्ते विकासमहामंडळाचेव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह केंद्र तसेच राज्यातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सोमवारी सत्कार झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये बांधकाम विभागाचे प्रधान सचिव अशिष सिंह, राधेश्याम मोपलवार, चीफ इंजिनिअर अे.बी गायकवाड यांच्यासह २१ अधिकारी- अभियंत्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्युज – अजित पवार

News Desk

दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात ३ घरे कोसळली, १ मृत्यू

News Desk

लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश असावा! – उपमुख्यमंत्री

Aprna