HW News Marathi
महाराष्ट्र

सर्कशीत आधी प्राणी होते आता जोकर आहेत, विदूषकाच्या विधानावर फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

रायगड | निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना, सर्कशीत पहिले प्राणी होते, पण आता फक्त जोकर राहिलेत हे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना माहिती होतं, त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला सर्कस संबोधलं अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांनी आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमतरता आहे असं सांगत टोला लगावला होता. त्यावर पत्रकारांनी आज देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, संजय राऊत म्हणतात…

News Desk

रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा काहीचा जीव मुंबईत; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Aprna

धनंजय मुंडेंनी पाळला महाविकास आघाडीचा धर्म!

News Desk