HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू !

मुंबई | “आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा पवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार असल्याचे आज (६ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप-शिवसेनेला जनतेने कौल दिला आहे. शिवसेना आणि भाजपने मिळून सरकार स्थापन करावे, असे मत पवारांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवारांची भेट घेतली. यावर पत्रकारांनी पवारांनी प्रश्न विचारला. यावर पवार म्हणाले की, राऊत कोणताही प्रस्ताव घेऊ आले नाहीत, असे सांगितले.

राष्टपती राजवट ही केवळ भाजपकडून शिवसेनेला भीती दाखवित असल्याचा दावा पवारांनी केला आहे. ४ वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मी मुख्यमंत्री बनण्यास बिलकुल इच्छा नाही, असे म्हणत स्व:ता पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. “२५ वर्षे युतीत सडले म्हणतात तरी एकत्र लढले,” असा टोला पवारांनी शिवसेनेला लगावला आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • शरद पवार मुख्यमंत्री बनण्यासाठी बिलकुल तयार नाहीत
  • संजय राऊत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन आले नाहीत
  • राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे
  • भाजप-शिवसेना दोघांनी मिळून सरकार स्थापन करावे
  • भाजप-शिवसेनेने राजकीय अस्थैर्य दूर करावे
  • आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू
  • देशात बाबरी मस्जिदसारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये
  • त्या भेटीबद्दल गडकरी आणि पटेलांनाच विचारा
  • गडकरींची भेट रस्ते आणि विकासकामांसाठीच असते
  • काँग्रेसने काय निर्णय घेतला याची माहिती मला नाही
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी
  • विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा
  • लोकांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. लोकांच्या निर्णयापुढे आम्ही काय बोलणार?
  • राष्ट्रवादी-काँग्रेसचा आकडा १०० च्या पुढे जात नाही
  • राष्ट्रपती राजवटीची फक्त शिवसेनेला भीती
  • ४ वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पुन्हा बिलकुल इच्छा नाही.
  • युतीत सोडले तरीही एकत्र लढले.
  • महाराष्ट्र अडचणीत आहे. लवकर निर्णय घ्यावा.
  • अयोध्या प्रकरणात कोणीही कायदा हातात घेऊ नये.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नारायण राणे यांची चार आण्याची पण लायकी नाही”, संजय राऊतांनी बोचरी टीका

Aprna

कोकणातील प्रकल्प लातूरला नेण्याच्या मागणीवरून शिवसेना खासदाराचा अमित देशमुखांना टोला

News Desk

महत्त्वाच्या शासकीय संस्थांना सुरक्षा पुरवा

News Desk