HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंच्या टीकेसंबंधी विचारताच फडणवीस पत्रकार परिषद सोडून निघून गेले

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतील योजना जनतेसाठी राबवाव्यात, असे आवाहन करून विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे असा घरचा आहेरही भाजपच्या नेत्यांना दिला. पंकजा मुंडे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.मी घरात बसले, म्हणून जे खूश आहेत त्यांनी माझा दौरा लिहून घ्यावा. दिल्लीपासून नाशिकपर्यंत आणि डिसेंबरमध्ये उसाच्या फडात जाऊन कामगारांशी संवाद साधणार आहे, असे सांगत हिंदी काव्याचा दाखला देत जगातील सर्व अन्याय सहन करण्याची ताकद आपल्यात असून मी सागरापेक्षा खोल आहे, मग मला कधीपर्यंत रोखणार, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला.

विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही

“मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि प्रत्येक सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. मात्र पंकजा मुंडे यांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता फडणवीस काही न बोलताच पत्रकार परिषदेतून निघून गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी २ मुख्यमंत्र्याच्या गावी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपचं खिंडार

News Desk

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी…

News Desk

परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं ! उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना…

News Desk