मुंंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये झालेल्या मोर्चामध्ये शिवसेनेला लक्ष्य केले होते. शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील,पण भाजपने नाही असे विधान त्यांनी केले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना सुनावत माफीची मागणी केली आहे,
ट्विटरवर ट्विट करत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्या “बांगड्या” या टिप्पणीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सर्वांत बलवान – महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहे,बांगड्या हे कमकुवत पणाचं नाही तर मजबुतीचं प्रतिक आहे”,त्यामुळे अशा पद्धतीचे विधान बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
काही दिवसांपुर्वी एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते,त्या वक्तव्यावरून फडणवीस यांनी शिवसेनेला टार्गेट केले होते.मात्र आता आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांकडे माफीची मागणी केली आहे.एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत असे वक्तव्य केले होते,मात्र आदित्य ठाकरे सध्या आपली एक वेगळी छबी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Shri @Dev_Fadnavis ji, normally I choose not to comment back. Kindly apologise abt bangles comment: bangles are worn by the strongest of all- the women. Politics can go on, but we need to change this discourse. Rather disgraceful coming from a fmr CMhttps://t.co/oMxPFWgdMS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 26, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.