HW News Marathi
महाराष्ट्र

फासा आम्हीच पलटणार ! फडणवीसांकडून सत्ता बदलाचे संकेत ?

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य करत राज्यातील सत्ताबदलाचे संकेत दिले आहेत. “फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार”, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी आज (५ फेब्रुवारी) केले आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा कुजबुज सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यावेळी केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले की, “राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. मात्र भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात आहे. राज्यात ही लोकशाहीची थट्टा सुरू आहे. मात्र, फासा आम्हीच पलटवू. शिडीशिवाय आम्ही हा फासा पलटवू आणि फासा खूप मोठा असेल”, असा थेट इशारा आता फडणवीस यांनी महाविकासआघाडीला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSCExam : राजकीय स्वार्थाला बळी पडू नका – आदित्य ठाकरे

News Desk

“ए तू चूप”, चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना दमदाटी

News Desk

ही तर नुसती सुरुवात, अजून महत्त्वाचा भाग बाहेर येणे बाकी ! | फडणवीसांचा सूचक इशारा  

News Desk