HW News Marathi
महाराष्ट्र

नया है वह! अब्दुल सत्तार यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा टोला

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठरवलं तर ते पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या युतीचा पूल बांधू शकतात, असे विधान ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरून अब्दुल सत्तार यांची खिल्ली उडवली आहे.

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तारांच्या युतीबाबतच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.फडणवीस म्हणाले, “नितीन गडकरी हे ज्येष्ठ नेते आहेत, ते युतीबाबत काम करू शकतात या सत्तारांच्या विधानाचा मला आनंद वाटतो. मात्र, त्यांना अजून शिवसेना माहीत नाही. नया है वह”, अशा फिल्मी स्टाईलने त्यांनी सत्तारांना टोला लगावला आहे.

युतीबद्दल बोलायला महत्त्वाचा माणूस हवा

फडणवीस म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. मात्र, गेल्या पाच ते सहा महिन्यात सत्तार हे मुख्यमंत्र्यांना भेटले तरी आहेत का? युती बाबत बोलायला महत्त्वाचा माणूस लागतो ना.. आणि सत्तार हे स्वतः शिवसेनेत नवीन आहेत. त्यामुळे असं काही बोलायचं असेल तर महत्त्वाचा माणूस हवा, असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या दरम्यान येणाऱ्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी अब्दुल सत्तार हे दिल्ली गेले होते. तिथे त्यांनी काल (४ जानेवारी) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर भाजप आणि शिवसेना युतीचा पूल फक्त गडकरीच बांधू शकतात, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. तर त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील सत्तार यांचा वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

सत्तार यांनी भाजप-शिवसेना युतीबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी चंद्रकांत खैरे हणले, युतीचा निर्णय हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील. त्यामुळे सत्तार यांना युतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही. सत्तार मंत्री असताना, त्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, अशा शब्दांत चंद्रकांत खैरेंनी सत्तार यांना फटकारलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजाच काय अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, राऊतांचा दावा

News Desk

राजेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी केले निंबाळकरांच्या पुतळ्याचे दहन

News Desk

कर्जमाफीच्या रकमेसाठी शेतक-यांना दिवाळीची वाट पहावी लागणार

News Desk