HW News Marathi
महाराष्ट्र

“दत्तक घेतलं म्हणजे रोज महापालिकेत दलाली खायची असं नाही” – फडणवीस

नाशिक | आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर निवडणुका तोंडावर असल्यामुळे आज भाजप नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर राज्य सरकारवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.

मागील निवडणुकीत मी नाशिक शहर दत्तक घेईन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हंटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. यावरून बोलताना फडणवीस म्हणाले, गेल्या निवडणुकीत जनतेने भाजपाला मोठा आशीर्वाद देत निवडून दिलं आणि त्यावेळेस मी नाशिकला दत्तक घेईन, असं म्हंटलं होतं. पण विरोधकांनी त्याचा गैरसमज करून घेतला. दत्तकचा अर्थ रोज महापालिका चालवायची आणि त्यातून दलाली खायची, असा काही लोकांचा गैरसमज झाला, असं फडणवीसांनी म्हंटलंय.

फडणवीस पुढे म्हणले, “पूर्वी अनेक लोक तसं करायचे. पण आमच्याकडे दत्तकचा अर्थ तसा होत नाही. आमच्याकडे दत्तकचा अर्थ एवढाच की महापालिकेचे पदाधिकारी महानगर पालिका चालवतील आणि त्यांना जिथे अडचण येईल तिथे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू”, असं ते म्हणाले. तसेच जेवढ्या देशातील आणि राज्यातील योजना आहेत, त्या सगळ्या योजना नाशिकमध्ये आम्ही आणून दाखवू. ” असंही फडणीस यावेळी म्हणाले.

यंदाही भाजपला जनतेचा आशीर्वाद मिळेल 

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी नशिकमधील कोरोना परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे. कोरोना काळात नाशिकवर अन्याय झाला असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. मुंबई, पुण्यात राज्य सरकारने कोविड सेंटर काढले. पण नाशिकमध्ये महापालिकेने कोविड सेंटर उभे केले. तर नाशिककरांना ऑक्सिजन मिळावे म्हणून भाजपचे पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ठिय्या आंदोलन केले आणि त्यानंतर नाशिककरांना ऑक्सिजन मिळाले असे, ते म्हणालेत. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत जनतेने भाजपला मोठा आशीर्वाद दिला होता. त्याचप्रमाणे यंदाही मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आणखी निधीची आवश्यकता, योगदानासाठी पुढे यावे !

News Desk

राज्यात ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने एकाच खळबळ; जाणून घ्या आरोग्य मंत्री काय म्हणाले

Aprna

ए.सीचा वापर न करता नैसर्गिक हवा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

swarit