HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून भरता येणार बारावीच्या परीक्षेचे अर्ज

मुंबई। यंदाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे १२वींच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठी चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आजपासून (१२ नोव्हेंबर) परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदन पत्रे १२ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in येथे घेतले जातील.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडेंना २६ मार्चपर्यंत अटक करण्याचे अल्टिमेटम

News Desk

व्हॉट्सअ‍ॅप मार्गदर्शिका प्रकाशित, समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी

News Desk

देशाचे चौदावे राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान सुरू छगन भुजबळ जेलबाहेर

News Desk