HW News Marathi
महाराष्ट्र

“या परीक्षेत आम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ”, पदवीधर निवडणूकीवरुन फडणवीसांची प्रतिक्रिया 

नागपूर | विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (१ डिसेंबर) नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषद निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं, पण त्याचा परिणाम नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. “महाराष्ट्रात सर्वच विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला चांगलं समर्थन मिळालं आहे. त्यामुळे निकालानंतर चांगलं यश प्राप्त होण्याचा आम्हाला विश्वास आहे. प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते. या परीक्षेत आम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ, असा विश्वास आहे. विधानपरिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसतं, पण त्याच्यावर परिणाम नक्कीच पाहायला मिळेल” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

“सुशिक्षित सुजाण मतदारांनी लोकशाही मजबूत केली पाहिजे. त्यामुळे नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा” असं आवाहन फडणवीसांनी केलं. तुमच्या घरचीच तीन नावं मतदार यादीत नाहीत, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, की “इतकी अचानक निवडणूक घोषित झाली. मतदार याद्यांमध्ये घोळ दिसत आहे. बरीच नावं सापडलेली नाहीत. बऱ्याच घरांमध्ये फॉर्म सर्वांनी भरले, पण दोघांचे नाव यादीत आहे, दोघांचे नाव नाही, असे आढळले. निवडणूक आयोगाला यंत्रणेत सुधारणा करावी लागेल. फॉर्म परिपूर्ण भरण्याची जबाबदारी आम्ही घेतली, निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव येण्याची जबाबदारी घ्यावी” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव अभिवादनासाठी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आजाद १ जानेवारीला उपस्थित राहणार

News Desk

शरद पवारांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बळीचा बकरा करू नका – आठवले

News Desk

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या! – मुख्यमंत्री

Aprna