HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार !

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार,” असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार केला. म्हणजे भाजप मुख्यमंत्री पद शिवसेनेला न देण्याचे स्पष्ट संकेत मुनगंटीवार यांनी आज (७ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार होते. मात्र, राज्यपालांच्या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करणार नसून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानवर चर्चा करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी सांगितले.

भाजपच्या या निर्णयामुळे कुठे तरी सरकार स्थापनेसाठी भाजपने नरमाईची भूमिका घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसून आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, “अल्पमतातील नाही तर राज्यात स्थिर सरकार देऊ,” असा विश्वास पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच काॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांना राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रीय होण्यास इच्छूक नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. “शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची भाजपची इच्छा,” असे देखील मुनंगटीवार म्हणाले. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार फोडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षातील आमदारांना आमदार फोडू शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा आणि लोकलचं तिकीट मिळवा!’

Jui Jadhav

करुणा मुंडेंची मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंकडे धनंजय मुंडेंची तक्रार, म्हणाल्या…

News Desk

“पाहणीसाठी नाही तर मदतीसाठी आलोय”,आदित्य ठाकरेंचं चिपळूणकरांना आवाहन

News Desk