HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात, अजित पवारांना सभेतून प्रत्युत्तर देणार

पंढरपूर | पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी नेते, उमेदवार सज्ज झाले आहेत. आपल्या उमेदवारांना जिंकवून देण्यासाठी नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कालच्या भर पावसातील सभेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आता पंढरपुरात जात सभा गाजविणार आहेत. फडणवीस १-२ नाही तर तब्बल ६ सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या सभेत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले होते.

अजित पवार यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा होणार असून अजित पवारांना ते या निमित्ताने उत्तर देणार आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या निवासस्थानी भोजन करून दुपारी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे व गादेगाव येथे प्रचार सभा घेणार आहेत. दौऱ्यातील शेवटची सभा दुपारी पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मंदिर येथे पटांगणात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्येः खा. अशोक चव्हाण

News Desk

गावगुंडाशी संबंध जोडून भाजपवाले पंतप्रधानांना बदनाम करत आहेत – पटोले

News Desk

शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे साधणार संवाद

News Desk