HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेसोबत युती? देवेंद्र फडणवीस म्हणाले….

रत्नागिरी | भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा मागच्या काही आठवड्यांपासून सुरु आहे. मात्र, अद्याप कोणीही याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. दोन्ही पक्षांकडून याबद्दलच्या चर्चा खोडून काढल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही या युतीबद्दलच्या चर्चांवर भूमिका मांडत भारतीय जनता पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे.

आम्हाला मनसेचे विचार पटत नाहीत

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत याआधीही स्पष्ट केलं होता आणि आताही आपल्या मतावर ते ठाम आहेत. मनसेसोबत युती करण्याबाबत काही चर्चा झाली का अशी विचारणा करण्यात आल्यावर फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला मनसेचे विचार पटत नाहीत. भारतीय जनता पार्टीने भाषेच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही. असा भेद आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मनसे आणि भाजपा यांची विचारधाराच जुळत नसल्याने युतीचा कोणताही विचार नाही.

राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दलच्या युतीबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सूचक विधान केलं आहे. फडणवीस दिल्लीहून नागपूरला दाखल होताच माध्यमांनी विमानतळावर त्यांना मनसेबद्दलच्या युतीबद्दल प्रश्न विचारला. त्याला फडणवीसांनी अतिशय मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा पुन्हा एखदा जोर धरु लागली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही

नागपूरला परतलेल्या देवेंद्र फडणवीसांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असं देखील फडणवीस पुढे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार, उर्जामंत्र्यांची घोषणा

News Desk

राज्याच्या महसुलात ऑगस्टमध्ये ३,७२४ कोटींनी झाली घट!

News Desk

दारू पिणाऱ्यांना महिलांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल

News Desk