HW News Marathi
महाराष्ट्र

संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू – देवेंद्र फडणवीस 

नाशिक | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल. त्यानंतर फेसबुकवर त्यांनी करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. नाशिकमध्ये जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याती आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचं सांगितलं आहे. असं संशयाचं वातावरणं राहणं योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावं. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आलं की, आम्ही आमची मागणी करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंचवटी एक्सप्रेसला गळती

News Desk

मुख्यमंत्र्यांचे खास नेता ईडीच्या रडारवर; चंद्रकांत पाटलांनी घेतलं नाव

News Desk

किरीट सोमय्या यांचा हसन मुश्रीफांवर शेकडो कोटी घोटाळ्याचा आरोप!

News Desk