HW News Marathi
महाराष्ट्र

राजकारण आणि टीका करण्याची वेळ नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

रत्नागिरी। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चिपळूणला पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. या घटनेचं राजकारण करण्याची किंवा कुणावरही टीका करण्याची ही वेळ नाही. सध्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढणं आणि नुकसानग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ही घटना घडल्यानंतर प्रविण दरेकर सर्वात आधी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न केला आहे.

मृतदेहांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे

देवेंद्र फडणवीस हे आज(२५ जुलै) चिपळूणमध्ये आहेत. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं. याप्रसंगी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. ही घटना घडल्यानंतर प्रविण दरेकर सर्वात आधी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न केला. या भागाची आम्ही पाहणी केली. अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. मात्र, एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहे. दोन किलोमीटर अंतरावर बॉडी गेल्या आहेत. या मृतदेहांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

प्रशस्तीपत्रं देण्यासाठी आलेलो नाही

राज्य सरकारने चांगलं किंवा वाईट काम केल्याचं प्रशस्तीपत्रं देण्यासाठी आलेलो नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. प्रशस्तीपत्रं देण्याची ही वेळ नाही. मृतदेह बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. प्रशासन चांगलं काम करत असेल तर त्यांच्या पाठी राहीलं पाहिजे. आज फोकस रिलीफवर असला पाहिजे. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर काय केलं पाहिजे याचं आकलन करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले आहेत.

सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल

चिलबलूंमधल्या पूर परिस्थितीत अनेक लोकांचे जीव गेले आहेत आणि घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत ८७ लोक गेल्याचं कळतं. ४४ मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती, अजित पवारांनी खोडून काढले सर्व आरोप

News Desk

मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

News Desk