HW News Marathi
महाराष्ट्र

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’, पंढरपूर निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंनी ३७३३ मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला आहे. महाविकास आघाडी सरकारला पंढरपूरच्या निकालानं धक्का बसला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय.

मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता कोरोनाशी लढायचं आहे. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळवलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आम्हाला पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो. या सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. बारा बलुतेदारात नाराजी होती, वीज तोडली गेली त्यावरुन जनता नाराज होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलयुक्त शिवार योजनेचा चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर! 

News Desk

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास सुरुवात

News Desk

वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड असल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीये, रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला

News Desk