नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी सीतारामन यांनी भांडवली गुंतवणूक वाढवून ५.५४ लाख कोटी रुपयांची केल्याची घोषणा निर्मला यांनी केली. यावेळी त्यांनी भविष्यामध्ये भारतात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात सध्या मेट्रोचे काम जोरदार सुरु झाले आहे. त्याची दखल केंद्राने या अर्थसंकल्पात घेतली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरदूत जाहीर केली आहे. त्यांनी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटी तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ०९२ कोटीची तरतूद जाहीर केली आहे.
याचे स्वागत विरोधी पक्ष नेते आणि मुळचे नागरपूरचे जे आहेत त्या देवेंद्र फडणवीसांनी केंद्राच्या या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकानं नाशिक मेट्रोचे मॉडेल, केंद्रानं स्वीकारलं ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारलं जाईल. हे विकासाचं आणि नवनिर्माणाच्या धोरणाचं यश आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अतंर्गत देण्यात आल्याची माहिती, देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्यांनी यााबाबत ट्विट केलं आहे.
In today’s #AatmanirbharBharatKaBudget GoI made a provision of ₹2092 crore for Nashik Metro.
Thank you Hon PM @narendramodi ji , Hon FM @nsitharaman ji !
Nagpur Metro Phase-2 too got ₹5976 crore. Both these proposals were sent during our tenure of Maharashtra Government.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.