HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत केली – देवेंद्र फडणवीस

मुंबई | केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत देण्यात आली, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रासाठी मान्य झालेल्या आणि अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या प्रकल्पांचे एकूण मूल्य ३ लाख ५ हजार ६११ कोटी इतकी आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, हा आरोप धादांत खोटा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

ते आज (१० फेब्रुवारी) मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आणि घोषणांचा सविस्तर तपशील सादर केला. पूर्वीच्या सरकारच्या काळात मोदी सरकार महाराष्ट्राला प्रत्येकवर्षी पाच ते सातपट जास्त मदत मिळत आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध होतं, निवडणूक होत नाही, पण हे सरकार असं आहे की विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचं हनन करतं, त्याबाबत आम्ही मित्रपक्षांसोबत बसू आणि निर्णय घेऊ. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्राला काय काय मिळालं?

* मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 1832 कोटींची तरतूद

*पुणे मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 3195 कोटींची तरतूद

*नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात 5976 कोटींची तरतूद

*नाशिकमधील रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात 2092 कोटींची तरतूद

*राज्यातील रस्तेबांधणीसाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त बजेट मिळालं आहे.

*10 हजार किमी पेक्षा जास्त रस्ते बांधले जातील

*मुंबईला पिण्याचं पाणी मिळावं या प्रोजेक्टसाठी 3 हजार कोटी रूपये

*घरोघरी पाणी मिळाव यासाठी 1 हजार कोटी रूपये

*शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6 हजार 823 कोटी

*रेल्वे प्रकल्पांसाठी 86696 कोटींची तरतुद झालीय, त्यापैकी यावर्षी सात हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आहेत.

*बीड परळी रेल्वेमार्गालाही पैसे मिळाले आहेत

*मुंबईच्या लाईफलाईन लोकलसाठी साडे सहा कोटी रूपये दिले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरेंचा प्रवास !

News Desk

स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

अहिल्याबाई होळकर जयंतीसाठीची परवानगी शासनाने प्रलंबित ठेवल्याने पडळकरांची टीका

News Desk