मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. कोरोनावर मात करायची असेल तर त्यावर लस हा एकाच उपाय आहे. माथाडी कामगारांना विविध संस्थांकडून सीएसआर फंडातून कोरोना लसीचे 20 हजार डोस उपलब्ध करून देण्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. माथाडी कामगारांचे लसीकरण 25 सप्टेंबरपर्यंत सातत्याने सुरु ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. शिवाय माथाडी कामगारांसाठी 24 तास सेवा देणारी ऍम्ब्युलन्स देण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे.
माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही
यावेळी बोलताना त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ‘माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही, लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे कोव्हीड-१९ संबंधीत लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे, यासाठी नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहिल’, असे उद्गार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहेत.
माथाडी कामगारांनी तर कोविडच्या काळात सुद्धा योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यामुळे त्यांचे लसीकरण करण्यासाठी @NarendraMathadiयांनी पुढाकार घेतला,ही अतिशय स्तुत्य बाब आहे. आणखी 20,000 लसी विविध संघटनांमार्फत उपलब्ध करून देऊ,असे अभिवचन दिले.
याप्रसंगी माझे मनोगत https://t.co/D64xNxzvFy— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2021
शासनाकडून पुरेसा लस पुरवठा होत नसल्याने सातत्याने लस तुटवडा
बाजार समितीमधून लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी माथाडी कामगार बाजारात येणे आवश्यक आहे. शिवाय बाजारातील गर्दी कमी करणे शक्य नसल्याने अशा गर्दीत माथाडी कामगारांना जीवमुठीत घेऊन काम करावे लागते. भाजीपाला आणि मसाला मार्केटमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली असली तरी शासनाकडून पुरेसा लस पुरवठा होत नसल्याने सातत्याने लस तुटवडा या ठिकाणी होत होता. त्यामुळे अनेक माथाडी कामगार लसीकरणापासून वंचित होते. परिणामी या लसीकरण कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गर्दी पाहायला मिळाली. तर बाजार समिती एमआयडीसी व रेल्वे यार्ड सारख्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेत राबणाऱ्या माथाडी कामगारांसाठी आज सोन्याचा दिवस असल्याची भावना माथाडी कामगारांनी व्यक्त केली आहे.
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या वतीने माथाडी कामगारांच्या मोफत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाचा आज शुभारंभ केला.
माजी मंत्री गणेश नाईकजी, नरेंद्र पाटील, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे आणि अन्य उपस्थित होते.#VaccinationDrive #LargestVaccinationDrive pic.twitter.com/lIOC11y8SD— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2021
आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर देवेंद्र नावाचा टॅटू काढल्यानंतर, आता जवळपास महिनाभराने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही, आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशिर्वादात ठेवा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नरेंद्र पाटील यांनी गेल्या महिन्यात आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.