मुंबई | संपूर्ण देशभरात दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत लाहे. परिणामी कोरोनाबाधित रूग्णांचे हाल सुरू आहेत. तर ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघण्यासाठी केंद्राला साकडे घातले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. तसेच या ट्विटसह तपशील मांडणारे दोन फोटोही शेअर केले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे.
त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील. बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार.
महाराष्ट्राला सर्वाधिक 1785 मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे.#Oxygen— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 25, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.