HW News Marathi
देश / विदेश

बिहारच्या जनतेला विकास हवा आहे जंगलराज नको आहे – देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली | बिहार व अन्य राज्यांत भाजपने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजपा यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. “बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नको आहे हे दाखवून दिलं. तसेच देशातील ११ राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठे यश मिळवले आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपला दिलेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. “बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नको आहे हे दाखवून दिलं. आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेने पूर्ण विश्वास टाकला आहे. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो. बिहारमध्ये भाजपाने 110 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजयाची टक्केवारी 67 टक्के इतकी असून 2015 मध्ये हीच टक्केवारी 34 इतकी होती. याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदी यांच्या गरीब कल्याणकारी योजना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जातं.”

“मी बिहारमधील भाजपाच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. संपूर्ण बिहारने कोरोना काळात देखील उत्साहाने निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला. या यशस्वी निवडणुकीसाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो. देशातील ११ राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठं यश मिळवलं आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला मिळालेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणाबरोबरच अन्य राज्यातील आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो. या सर्व निवडणुकींमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे मार्गदर्शन केलं, जे कष्ट घेतले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजेंच्या मंत्रिपदासाठी तरूणाने लिहिले रक्ताने पत्र …..

Arati More

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Aprna

योग ही भारताने जगाला दिलेली भेट | मोदी

News Desk