HW News Marathi
महाराष्ट्र

भ्रष्टाचार करणाऱ्याला तर देवेंद्र फडणवीसांनी जोड्यांनी मारले पाहिजे!

मुंबई | ‘भ्राष्टाचार करणाऱ्याला तर देवेंद्र फडणवीस यांनी जोड्यांनी मारले पाहिजे.आणि हे त्यांची वकिली करत आहेत,’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आयएएस विक्रांतच्या नावाने ‘सेव्ह विक्रांत’ नावाखाली जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप राऊतांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आज (७ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घाण्याची मागणी केली. राऊतांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. 

राऊत म्हणाले, “आयएएस विक्रांतच्या नावाने ‘सेव्ह विक्रांत’ नावाखाली जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला. हा मुद्दा महाराष्ट्रात नाही तर देशभरात गाजणार आहे. सेव्ह विक्रांतच्या नावावर किरीट समोय्या आणि त्यांचा मुलगा यांनी देशभरातून करोडो रुपये जमा केले आहेत.  आणि या पैसेच पीएमसी बँकेच्या माध्यमातून त्यांनी मनी लाँन्ड्रिंग झाले आहे. मला आर्श्चय आहे की, देवेंद्र फडणवीस जे देशभक्तीचे गाणे गातात. हिंदुत्वाची भाषा करतात. मी काल पाहिले की, ते देशद्रोही किरीट सोमय्या यांची वकिली करत होते. देवेंद्रजी तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. तुम्ही राष्ट्रीय स्वयंमसेवक संघचे नावाजलेले कार्यकर्ता आणि सेवक आहात. तुम्ही सोमय्यांची जी वकिली केली ना त्यांनी स्वर्गातील श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, गोलवळकर गुरुजी, रजू भयाजी, हेगडेवारजी आणि आजचे आपले सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांचे आत्मा आज काय बोलत असणार. यासारख्या भ्राष्टाचार करणाऱ्याला तर देवेंद्र फडणवीस यांनी जोड्यांनी मारले पाहिजे. लोकांसमोर चार जोड्यांनी मारले पाहिजे. आणि हे त्यांची वकिली करत आहेत. माझे या देशातील राष्ट्रभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन आहे. तुम्ही यात बारकाईने लक्ष घाला. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी तुम्ही पण बघा तुमच्या नावावर काय सुरू आहे.” 

आयएनस विक्रांतसोबत देशाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. शिवसेना सोमय्यांविरोधात राज्यभर आंदोलन करणार असून आयएनएस विक्रांतच्या नाववर करणाऱ्यांना भ्रष्टाचार करणाऱ्याला अरबी समुद्रात बुडवणार, अशा धमकी वजा इशारा राऊतांनी सोमय्यांना दिला आहे. आणि कोणी गद्दार महाराष्ट्रात निपजला असेल तर त्याला या मातीत गाडणारच असेही ते म्हणाले.

Related posts

पुणे- बंगळूर महामार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला

News Desk

जो खुर्चीत बसतो त्याने निर्णय घ्यायचा, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही

News Desk

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी !

News Desk