HW News Marathi
महाराष्ट्र

“त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही”, देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रा सुरु करण्याआधी त्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं समोर आलं आहे. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. असं करताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या या विचारांची तुलना थेट तालिबानी विचारसरणीशी केली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकांचा बाण सोडला आहे. “ज्या लोकांनी हे केलं असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता

“ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असं सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे”, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

…..त्यांना आज शिवसेना दिसली

बाळासाहेबांच्या स्मृतीला शुद्ध करणारे शिवसैनिक किशोर अप्पा पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया देत नारायण राणेंवर टीका केली आहे. “आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथे वाहिली. त्यांना आज शिवसेना दिसली. इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. देशाच्या टॉप ५ मध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केलं आहे. मी रोज इथे येतो”, असं ते म्हणले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना बाधितांची रुग्ण संख्या शंभरीच्या खाली!

News Desk

राज्यात २२९ नवीन रुग्णांचे निदान, एकूण कोरोना बाधितांची संख्या १३६४

News Desk

साक्षीकडून माहीला अनोख्या शुभेच्छा

News Desk