HW News Marathi
महाराष्ट्र

“महाविकासआघाडीला अखेर सुबुद्धी झाली”, फडणवीसांचा ‘या’ कारणावरुन सरकारला टोला

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात चांगलेच वेठीस धरले आहे. सचिन वाझे, परमबीर सिंग ते पोलीस बदल्यांचा घोटाळा आदी प्रकरणात आरोप करत ठाकरे सरकारला कोडींत पकडू पाहणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कामाचं कौतूक केलं आहे.आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी सरकारच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट झाल्याची स्थिती असून, दररोज ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यानं सरकारने चाचण्याचं प्रमाणही वाढवलं आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबद्दल फडणवीसांनी समाधान व्यक्त केलं आहे.

“गेल्या १० दिवसांत सरासरी १,२६,९५० चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय! अधिकाधिक ९० हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच करोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पाहावी लागली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात अखेर सुरुवात

अमेरिकेतील बायोटेक कंपनी Novavax आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात अखेर सुरुवात झाली आहे.ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिेएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला यांनी दिली आहे.जानेवारी महिन्यात Novavax या लसीची चाचणी ही आफ्रिकेतील २४५ कोरोना रुग्णांवर करण्यात आली होती. त्यानंतर या लसीची ट्रायल ही ब्रिटनमधील १५,००० कोरोना रुग्णांवर करण्यात आली. त्यावेळी कोरोनाच्या मूळच्या स्ट्रेन विरोधात ही लस ९६.४ टक्के प्रभावी ठरली तर ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनविरोधात ती ८६.३ टक्के प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दानवे विरोधात शिवसैनिकांनी केले ” जोडे मारो आंदोलन “

News Desk

पक्षी फडफडायला लागला की समजायचे नेम अचूक बसलाय !

swarit

‘नितीश कुमार सरकारसोबत आहेत पण त्यांचं मन आमच्यासोबत’, संजय राऊतांची प्रतिक्रिया!

News Desk