अमरावती | महाविकास आघाडीच्या सोलापूरमधील प्रचार सभेत झालेल्या गोंधळाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या गोंधळाची दखल घेत विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते अमरावती येथे विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचाराला आले होते.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. “तीन पक्षांमध्ये झालेली ही नैसर्गिक आघाडी नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्याने यांच्यात गोंधळ उडत राहणार आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सोलापूरममध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सभा आयोजित केली होती. त्यावेळी सभास्थळावरील फलकावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेस कार्यकरत्यांनी गोंधळ घातला होता. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.