HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीचे पडसाद उमटू लागल्यानंतर फडणवीसांचे गोयल यांना पत्र

मुंबई | केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी केल्यानंतर देशातून, राज्यातून त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातूनही तीव्र आणि संतप्त पडसाद उमटल्यानंतर राज्य भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आज (१६ सप्टेंबर) केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

“कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत मी तुमच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला होता. त्यावेळी मी कांदा निर्यातबंदी उठवण्याची आपल्याकडे मागणी केली होती. त्यामुळे कांदा निर्यातबंदी त्वरीत मागे घ्यावी, अशी मी आपल्याला पुन्हा एकदा या पत्राद्वारे मागणी करत आहे, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे चांगली मिळकत होते. निर्यातबंदी घातल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असून दु:खी झाला आहे. त्यामुळे आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल, ही आशा आहे”, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

 

 

Related posts

एसटीची संप अटळ, एसटी संघटनांची मुख्यमंत्र्यां बरोबरची चर्चा फिसकटली

News Desk

मुंबईत सीएसटीसमोर चालत्या टॅक्सीनं घेतला पेट

News Desk

देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच ३ वाघांचा बळी

Gauri Tilekar