HW News Marathi
महाराष्ट्र

पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी  

बारामती | विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारचं आहे. परंतु केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. टोलवाटोलवी नको आहे, राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.

राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. यावर फडणवीस म्हणाले, राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यावर वाद करत बसण्याची ही वेळ नाही. सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. याच्या पूर्वीही असं झालं आहे. आम्ही देखील हे पाहिलं आहे. राज्यपालांबरोबर यापूर्वीही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नसून शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्वाचं आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

शरद पवारांना सरकारला पाठिशी घालावं लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकला नव्हता. आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळेजण आता जनतेच्या भेटीसाठी घराबाहेर पडले आहेत,’ असं फडणवीस म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेंचा झाला, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

News Desk

अर्थसंकल्पावर समानधानकारक उत्तरे नाहीत, फडणवीसांचा सभात्याग

swarit

“चंद्रकांतदादांचे 200+चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या”, राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

News Desk