HW News Marathi
महाराष्ट्र

मेट्रो-३ च्या प्रकल्पावरुन पुन्हा एकदा फडणवीसांकडून सरकारची कानउघाडणी

मुंबई | मेट्रो-३ कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार करून, नवीन कमिटीचा निव्वळ फार्स करण्यात येत अस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यातून मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल सुरु आहे, असे पत्रंच फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. त्याचबरोबर हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी खासगी विकासकांना मोठा आर्थिक फायदा करुन देण्यासाठी हालचाली होत आहेत, असा प्रकार समोर येईल. तेव्हा मुख्यमंत्र्यांवरही संगनमताचा आरोप होईल, असंही फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

“मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रोच्या प्रश्नावर अतिशय अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. मुळात मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरेचीच जागा सर्वार्थाने योग्य असताना कांजुरमार्गच्या जागेचा आग्रह धरला जात आहे. आता तर काही प्रशासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यातून राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान तर होणारच आहे, शिवाय, मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडणार आहे”, असं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. त्याचबरोबर आरे कारशेडची जागा २०३१ पर्यंतच पुरेशी आहे आणि त्यानंतर नवीन जागा शोधावी लागेल, असं सांगण्यात येत आहे. पण हे धादांत खोटे असून मेट्रो-3ची अंतिम डिझाईन क्षमता ही २०५३ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजू शेट्टींनी टोकाची भूमिका घ्यायची गरज नव्हती” – जयंत पाटील

News Desk

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

Aprna

परमबीर सिंगांनी गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपचा तपास आता CBI करणार

News Desk