HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते पण…

Lमुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाने धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. राज्यातील या सर्व विषयांवर पण प्रामुख्याने कोरोना संकटात विरोधी पक्षाने घातलेल्या गोंधळवाल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रीपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, असं ज्युलिओ रिबेरो म्हणालेत. रिबेरो यांनी ‘ द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी कायदा दाखवत त्यांना सुनावले आहे.

ज्युलिओ रिबेरोंनी फडणवीसांना कायदा दाखवला

ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदा दाखवला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवड्याच्या प्रकरणात ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनला गेले होते. खरंतर रेमडेसिवीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे कोरोना संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रूक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा एक स्वतंत्र चौकशीचा विषय आहे.

मात्र, ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला होता. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या, योग्य नव्हत्या. यावेळी ते असंही म्हणाले की, फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला होता.

रिबेरोंनी मुंबई पोलिस आयुक्तपदी असतानाचा सांगितला एक किस्सा

यावेळी बोलताना ज्युलिओ रिबेरो यांनी १९८० साली जेव्हा ते मुंबईच्या आयुक्तपदी होते तेव्हाच एक किस्सा सांगितला. त्यावेळी वसंतदादा पाटील यांचे सरकार होते. तेव्हा सत्ताधारी काँग्रेस पक्षातील आमदार भाऊराव पाटील आणि ए.आर. अंतुले यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील प्रमुखांना शिवीगाळ केला होता. हा प्रकार मला समजला तेव्हा मी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच हे प्रकरण दंडाधिकारी न्यायालयसमोर मांडून भाऊराव पाटील यांना समन्स बजावण्याची मागणी केली होती.

त्यानुसार न्यायालयाने समन्सही जारी केले होते. मात्र, भाऊराव पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, जामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर भाऊराव पाटील यांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधून हे प्रकरण बंद करण्याची मागणी केली. तेव्हा आमदाराने संबंधित अधिकाऱ्याची माफी मागितल्यास हे प्रकरण बंद करण्याची तयारी मी दर्शविली होती. मात्र, भाऊराव पाटील हे माझी म्हणजे आयुक्तांची माफी मागायला तयार होते पण त्या अधिकाऱ्याची माफी मागण्यास तयार नव्हते. मला हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्यानंतर हे प्रकरण मी मुंबईच्या आयुक्तपदी असेपर्यंत थंडच राहिले. मात्र, आतादेखील त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी, असे ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले आहे.

भाजप महाविकासआघाडी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे ते असंही म्हणाले की, सध्या भाजप महाविकासआघाडी सरकारला पाडणयासाठी कुरघोडी करत आहे. सुशांतसिंग प्रकरणात भाजपचा प्रयत्न फसला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरणात भाजप काहीप्रमाणात यशस्वी ठरली. आणि आताही कोरोनाच्या काळात रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे आहे, असे ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले आहे. लोकांना हा प्रकार फारसा रुचणारही नाही, असा इशाराही रिबेरो यांनी दिला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड जिल्ह्यात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ८०१ प्रकरणे निकाली

News Desk

उद्धव ठाकरेंसबोत कोण कोण घेणार शपथ

News Desk

राष्ट्रवादीला धक्का ,अनिल देशमुखांच्या मुंबईसह १० ठिकाणी CBI चे छापे !

News Desk