HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावरून फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. तीन महिन्यांपासून वेतनात कपात, कामगार कपातीच्या संकटामुळे सातत्याने डोक्यावर टांगती तलवार, भविष्यासाठीची अनिश्चितता यांसारख्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली. भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी या पत्रासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक, त्यांचे शोषण तातडीने थांबवण्याबाबत. मागील तीन महिन्यांचे वेतन नाही, कामगार कपातीमुळे भविष्याच्या निर्माण झालेल्या समस्या, त्यांच्या जीवनातील अनिश्चितता याकडे लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्य महामार्ग परिवहन सेवेतील(एसटी) कर्मचाऱ्यांची सध्या परवड सुरू आहे. हे सर्व कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तीन ते चार महिन्यांपासून काही महिन्यांचे आंशिक वेतन त्यांना प्राप्त झाले. जूनचे तर वेतनच अद्याप प्राप्त झालेले नाही.

एसटी कर्मचाऱ्यांपैकी ३२८ कर्मचारी करोनाबाधित झाले त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला. ते सुद्धा या काळात करोना वॉरिअर्सप्रमाणे सेवा देत असल्याने त्यांच्याही समस्यांकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने करोना बळींना ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तथापी मृत्यू झालेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. एसटी ही ग्रामीण परिवहनाचा आत्मा आहे. या समस्यांकडे आपण तातडीने लक्ष द्यावे, ही माझी विनंती आहे. असंही फडणवीस यांनी पत्रात सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही !

News Desk

नारायण राणेंना पोलिसांकडून अटक!

News Desk

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार, आरोग्यमंत्र्यांचे संकेत

News Desk