HW News Marathi
Covid-19

कोरोना नियंत्रणात, निर्बंधांचं काय?, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक | राज्यात कोरोना रुग्ण जरी कमी होत असले तरी संकट कायम अद्याप तसंच आहे. नागपुरातील करोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. सातत्याच्या लॉकडॉऊन मुळे आधीच विविध छोटे व्यवसायीक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपूर मधील निर्बंधांमध्ये तातडीने शिथीलता देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

काय म्हणाले फडणवीस?

कोरोनाचं संक्रमण कमी होत असल्याने आता निर्बंध शिथिल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पात्र लिहिलं आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला करोनावर मात करावी लागेल. करोना विरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये. आर्थिक विवंचनेमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. कल्याणमध्ये व्यापाऱ्याने आत्महत्या केली, नालासोपाऱ्यात एका तरुणाने जीवन संपविले, चंद्रपूर येथे एका भोजनालय चालकाने आत्महत्या केली, असे नमूद करत देवेंद्र फडणवीस यांनी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याची आवश्यकता पत्रात अधोरेखित केली आहे.

दोन डोस झाल्यानंतर बाहेर फिरू शकता?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाची मागणी केली आहे. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे १०० ते १२० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांमध्ये ३ लाख १७ हजार ५३२2 कोरोना रुग्णांची नोंद

Aprna

देशात गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णांची वाढ !

News Desk

सीबीएसई-आयसीएसई बोर्डाकडून आज दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द

News Desk