HW News Marathi
देश / विदेश

माझा ठरलंय…मी आता वेगवान बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार ! फडणवीसांचा सूचक इशारा

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडणाऱ्या धक्कादायक घडामोडी आणि खुलाशांमुळे महाविकासआघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. तर ठाकरे सरकारविरोधात भाजपही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२५ मार्च) खास क्रिकेटच्या शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले कि, “माझं ठरलंय. मी आता वेगवान बॉलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे.” दरम्यान, फडणवीसांचे हे वक्तव्य ठाकरे सरकारसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून ठाकरे सरकारची पुरती कोंडी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज खरंतर वेगळ्या शैलीत सरकारला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडीला इशारा देताना म्हणाले कि, “क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायची नाही. आता मात्र माझं ठरलंय. मी आता वेगवान बॉलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे.”

सध्याच्या परिस्थितीत मला इतके लूज बॉल मिळतायत कि…!

देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना पुढे म्हणाले कि, “सध्याच्या परिस्थितीत मला इतके लूज बॉल मिळतायत की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. बॉलिंगचं म्हणायचं तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल आणि ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. मला वाटतं की त्यामुळेच समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कलम ४९७ वर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज देणार निकाल  

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna

पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

News Desk