HW News Marathi
महाराष्ट्र

बीड पोलीस दलासाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न!

बीड | बीड येथिल पोलीस मुख्यालय या ठिकाणी आज (२२ जून) जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड पोलीस दलास दुचाकी व चार चाकी गाड्या वितरित करण्यात आल्या. या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की,माझ्या जीवनातले हे पाहिले महत्वाचे काम असून माझ्या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षम आहे.

मात्र वाहनानेही संपन्न असण्यासाठी पोलीस दलाला वाहनांची साधनांची कमतरता नसावी यासाठी बीड जिल्हा नियोजन समिती मार्फत 151 दुचाकी व 8 स्कॉर्पिओ तसेच डायल 112 या 4 चाकी 4 गाड्या आज देण्यात आल्या. यामुळे पोलीस यंत्रणेला नक्कीच तपासात गती मिळेल अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

महिलांच्या सुरक्षेसाठी 6 गाड्या तर पिंक मोबाईल ही नवीन संकल्पना देखील जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याचे एस पी आर राजा यांनी म्हटले आहे. यासोबत पहिल्यांदाच महिला बिट अंमलदार हे सुद्धा महिलानसाठी ही संधी दिली आहे.

नक्कीच जिल्ह्यातील गुन्हेगारी ही कमी होईल तसेच हुन्हेगारात वचक ही वाढेल असे ते म्हणाले. यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप,जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,सह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिले कोरोना टेस्ट किट जन्माला घातले आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला…

swarit

माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटीचे कार्पेट; राऊतांचा मुनगंटीवारवर आरोप

Aprna

मनसेचा रेल्वे प्रवास’, जनतेच्या हितासाठी करणार आंदोलन!

News Desk