HW News Marathi
देश / विदेश

धनंजय मुंडे आमदार झाले,अमोल कोल्हेंचा प्रण पुर्ण झाला..मुंडे जेव्हा कोल्हेंना फेटा बांधतात!

बीड (परळी ):-‘जेव्हा परळीकर धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन,’ हा खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवस्वराज्य यात्रेत  प्रण केला होता. तो प्रण आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते फेटा बांधून अमोल कोल्हेंनी  पूर्ण केला.

शिवपुत्र संभाजी नाटकाचा प्रयेग पार पडल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंनी अमोल कोल्हेंना फोटा बांधत आपल्या भावना व्यक्त केल्या धनंजय मुंडे म्हणाले, ‘गेल्या चार महिन्यांहुन अधिक काळ खासदार अमोल कोल्हे यांनी फेटा बांधला नव्हता, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या अभिनयातून देशाच्या घराघरात पोचवलेल्या खा. अमोल कोल्हे यांना फेटा शोभून दिसतो असे .आज फेटा बांधताना मित्र कसा असावा ह्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे होय,असे धनंजय मुंडे म्हणाले ते पुढे बोलतांना म्हणाले की,मी आपणा सर्वांच्या साक्षीने सांगतो. त्यांना फेटा बांधून त्यांचा प्रण आज पूर्ण केले व त्यांचे व मला निवडून दिलेल्या तमाम परळीकरांचे आभार मानतो’ अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी विधानसभा निवडणूकच्या अगोदर दिलेले सर्व शब्द मी येत्या 5 वर्षाच्या आत पूर्ण करणार असून मी परळी मतदार संघाचा मी विकास करणार असल्याचे या वेळी बोलतांना ते म्हणाले.मंत्री म्हणून आज पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी जनतेचे जाहीर आभार व्यक्त करीत म्हणाले की, या जनतेचे उपकार कधीच विसरू शकत नाही तर माझ्या अंगावरच्या कातड्याचे जोडे करून देखील आपल्याला घातले तरी आपल्या उपकाराची परतफेड कधीच करू शकत नसल्याचे त्यांनी या प्रसंगी बोलतांना म्हणले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानी बहीण बांधणार मोदींना राखी!

News Desk

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का- सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा….

News Desk

२०१९ मध्ये होणार ‘चंद्रयान-२’ प्रक्षेपण

Gauri Tilekar