HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही ! परळीत धनंजय मुंडेंचा संकल्प

बीड । गेल्या वर्षभरापासून कोरोनाने महाभयानक थैमान घातलं असतांना राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू, आता कोरोनाची परिस्थिती हळू-हळू पूर्वपदावर येत आहे, रूग्णांच्या संख्येतही घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने ठिकठिकाणी अनलॉक करायला देखील सुरूवात केलीये. मात्र काही तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचीही शक्यता आता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जनतेला आता काही गाईडलाईन्स जारी केल्यात, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी एक मोठा संकल्प केला आहे. “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बीड जिल्ह्यातील परळीमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही”, अशी ग्वाही धनंजय मुंडे दिली आहे.

परळीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते त्या ठिकाणी बोलत होते. कोरोनाची येणारी तिसरी लाट ही गंभीर आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी परळी सज्ज आहे. त्यासोबतच परळीतील एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना किती आरोग्य सुविधा, ऑक्सिजन आणि औषध साठा लागेल याची निश्चिती करा. तसेच दररोज ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट पुर्ण करताना राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वेगाने वाढवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Aurangabad : मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधितून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

News Desk

कामगारांमध्ये भेदभाव नको, नियमित सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, यंदा सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा करु ! 

News Desk