HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या – धनंजय मुंडे  

औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असून, पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव गोवण्यात आल्यानं अनेक राजकीय पडसादही उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही आता पूजा चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत सत्य समोर येईल त्यानंतर अधिक बोलता येईल, असंही धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

कोण आहेत मंत्री संजय राठोड?

संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत. ते बंजारा समाजातून येतात. शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा २००४साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर २००९ आणि २०१४ अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले. फडणवीसांच्या २०१४ साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता.

Related posts

चोरलेल्या दुचाकी विहीरीत टाकून पोलीसांना गोंगारा

News Desk

कोल्हापूर जिल्हा पाच दिवसांपासून पाण्याखाली

News Desk

वैद्यनाथ कारखान्याच्या चोरी प्रकरणातराष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचे निष्पन्न!

News Desk