HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

धनंजय मुंडेंनी कार्यक्रमात सांगितली राजाची गोष्ट, म्हणाले ‘देव करतो, ते भल्यासाठीच करतो!’

Lबीड | रेणू शर्मा आणि करूणा शर्मा या दोघी बहिणींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये वादात आणि अडचणीत सापडल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले. बीडच्या परळीमध्ये एका कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांचं अप्रत्यक्ष वर्णन करताना राजा आणि प्रधानाची सांगितलेली गोष्ट सगळ्यांचीच दाद मिळवून गेली. धनंजय मुंडेंनी त्यांच्याच शैलीत लगावलेले हे फटकारे बीडकरांसाठी मात्र विशेष ठरला आहे.

धनंजय मुंडे यांनी सांगितलेली गोष्ट काय?

“एक राजा असतो. दरबारात बसल्या बसल्या त्याचं तलवार पुसायचं काम चालू असतं. यावेळी त्याचं थोडं लक्ष विचलित होतं… धारदार तलवारीने त्याच्या एका हाताचा अंगठा तुटतो. तितक्यात शेजारी उभा असलेला प्रधान म्हणतो, “राजे देव करतो भल्यासाठीच”… राजाला राग येतो…. राजा आदेश देतो… या प्रधानाला काळ्या कोठडीत डांबा… प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा होते….”

बऱ्याच दिवसांनंतर राजाला हुकी येते की आपण शिकारीला जाऊ… राजा शिकारीला निघतो. सोबतीला सोनापती… आणखी थोडी फौज… दाट जंगलात राजा जातो… फौज मागे पडते… तिथले आदिमानव राजाला पकडतात. ते त्या राजाला त्यांच्या राजाकडं घेऊन जातात… त्यावेळी तिथे नरबळीची प्रक्रिया चालू असते. नेमकं त्याच वेळी त्यांना बरबळी हवा होता… आदिमानवांनी त्यांच्या राजाला सांगितलं, आम्ही नरबळी आणलाय.. प्रथेप्रमाणे राजाला अंघोळ घातली गेली. पण अंघोळ घालत असताना एका वृद्ध आदिमानवाच्या लक्षात येतं ‘याला तर अंगठा नाही’… असा नरबळी नको… ते पाहिल्यानंतर संबंधित राजा त्या राजाला सोडून देतो…

“सुटका झालेला राजा पळत पळत आपल्या राजवाड्यात येतो… आपल्या सैनिकांना आदेश देतो… प्रधानाला सोडा… प्रधानाला सोडलं जातं…. राजा आपल्या प्रधानाला त्याला मिठी मारतो.. जंगलातला सगळा प्रकार राजा आपल्या प्रधानाला सांगतो… त्यावेळी प्रधान पुन्हा एकदा म्हणतो, राजे मी म्हटलं होतं ना तुम्हाला देव करतो तो सगळं भल्यासाठी करतो… पण राजे तुम्ही मला जेलमध्ये टाकलं.. ते सुद्धा बरंच केलं.. जर तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं तर मी तुमच्यासोबत जंगलामध्ये आलो असतो… मी सावलीसारखा तुमच्यासोबत असतो… नरबळीवेळी तुमचा अंगठा तुटला म्हणून त्यांनी तुम्हाला सोडलं असतं पण मला धरलं असतं. म्हणून संजय भाऊ देव करतो तो भल्यासाठीच करतो….

Related posts

Pune Wall Collapse : १४ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

News Desk

पहा…मुलींनंतर आता डास पळविणार आमदार राम कदम

News Desk

औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम’वरून तोडफोड, video

News Desk