HW News Marathi
महाराष्ट्र

एस.टी. कर्मचारी संपास आणि प्रवाशांच्या होणार्‍या  त्रासास राज्य सरकारच जबाबदार- धनंजय मुंडे

परळी बसस्थानकास भेट देऊन संपकरी कर्मचा-यांशी केली चर्चा

सर्वसामान्यांच्या प्रवाशांचे साधन असणारी एस.टी वाहतुक सरकारला मोडीत काढायची असल्यामुळेच ते तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या एस.टी कर्मचार्‍यांच्या संपाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तीन दिवसांपासुन होणार्‍या सर्व सामान्य प्रवाशांच्या त्रासास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राज्य भरातील एस.टी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर असल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. या पार्श्वभूमिवर मुंडे यांनी परळी वैजनाथ बसस्थानकास भेट देऊन तेथील संपकरी एस.टी कर्मचार्‍यांशी चर्चा केली. या कर्मचा-यांच्या मागण्या अतिशय रास्त असल्याने या संपाला पाठिंबा देतानाच संपाची जाणिव असतांनाही एैन दिवाळीत सामान्यांचे संपामुळे हाल होणार नाहीत याची काळजी घेवुन सरकारने या संपाबाबत आधीच तोडगा काढणे आवश्यक असतांना सरकारने जाणीवपुर्वक संपाकडे दुर्लक्ष केल्यानेच कर्मचा-यांवर अन्याय आणि सामान्यांचे हाल होत असल्याचे ते म्हणाले. सरकारला एस.टी महामंडळ मोडीत काढायचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना आपण स्वतः तीन दिवसांपुर्व भेटुनही संपाची दखल घेतली गेली नाही. राजकिय फायद्यासाठी सत्ताधारी असतांनाही प्रत्येक आंदोलनात सहभागी होणारे भाजपा, शिवसेना हे पक्ष आज लाखो एस.टी कर्मचा-यांच्या संपाबाबत आणि सामान्य नागरिकांच्या होणार्‍या त्रासाबद्दल गप्प का आहेत. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने या संपाबाबत तातडीने तोडगा न काढल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा ही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraResult2019 : जाणून घ्या…कशी होते मतमोजणी

News Desk

दानवे म्हणाले- “मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो”

News Desk

राज्यात आज अखेर लम्पी आजारावरील १०६.६२ लाख लस मात्रा उपलब्ध

Aprna