HW News Marathi
महाराष्ट्र

धारावीत १५ तर दादरमध्ये २ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई | राज्यात विशेषत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मुंबईत प्रामुख्याने अधिक वाढत आहे. सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आज (१२ एप्रिल) धारावीत १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर दुसरीकडे दादरमध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामूळे धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या ही ४३ वर तर दादरमधील संख्या १३ वर गेली आहे.

धारावीत आढळलेल्या १५ जणांपैकी ९ जण हे राजीव गांधी क्वॉरंटाईन केंद्रातील आहेत. त्याच क्वॉरंटाईन केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हे ९ जण धारावीतील सोशल नगरमध्ये मृत्यू झालेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. या १५ जणांमध्ये २० आणि २४ वर्षाच्या तरुणींचा समावेश आहे. तर बाकी रुग्ण हे १८-६६ या वयोगटातील आहे. तर दादरमधील २ रुग्ण हे कामगार स्टेडियमजवळील आंबेडकर नगरमधील ५३ वर्षीय महिला आणि कासारवाडीतील पालिका कर्मचारी वसाहतीतील ४८ वर्षीय पुरुषाला लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे सगळे विभाग पोलीसांकडून सील करण्यात आले आहेत, आणि आणखी खबरदारी घेण्यात येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील केंद्र सरकारने बंदी उठवावी, मुर्तीकारांची राज ठाकरेंकडे मागणी 

News Desk

काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?: विखे पाटील

swarit

“लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये…” – नारायण राणे

News Desk