HW News Marathi
Covid-19

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही!

मुंबई | कोरोनाचा उद्रेक संपूर्ण देशात झाला होता. त्यातही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. अशात आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा मोठा कहर पाहायला मिळाला होता. मात्र, धारावी मॉडेल राबवून लोकांनी धारावीतील कोरोना रुग्ण संख्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत थोपवून ठेवली. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर धारावीत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. पहिल्यांदाच धारावीत शून्य रुग्ण संख्येची नोंद झाली आहे. कोविड 19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात तेथे एकही रुग्ण सापडला नाही.

धारावीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर आली आहे. जी / उत्तर वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेनं जाहीर केली. या आकडेवारीनुसार, या वॉर्डमध्ये केवळ 9 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पहिल्यांदा एकही रुग्ण आढळून आला नाही. याआधी एक दिवस हा आकडा दोन वर होता. सध्या धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 861 इतकी आहे. तर दादरमध्ये 3 तर माहिममध्ये 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला ६० लाखांचा टप्पा

News Desk

देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले

News Desk

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

News Desk