HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार-शाहू छत्रपतींची भेट ! महाराष्ट्रात राजकीय वादळाची चाहूल?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सकाळीच अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेस इथे भेट घेतली. या भेटीदरम्यान संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते . मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांचं लक्ष वेधणारी ही भेट आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे शाहू महाराज आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा होते याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे.संभाजीराजे छत्रपती यांचे वडील असलेले शाहू छत्रपती यांची भूमिका अजित पवारांच्या भेटीनंतर महत्वाची ठरणार आहे.

#shahuchattrapati #sambhajiraje #ajitpawar #sharadpawar #marathareservation #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी लोटांगण घालत फिरेन’! ShivendraRaje Bhosale आणि Udayanraje Bhosale यांच्यातला वाद चिघळला”

News Desk

‘गद्दारांना क्षमा नाही, येत्या निवडणुकीत ठाणेकर…’, Rajan Vichare यांचा हल्लाबोल

News Desk

सध्या ‘Remove China App’ इतक्या चर्चेत असण्याचं कारण काय ? | Remove China App

Gauri Tilekar