HW News Marathi
महाराष्ट्र

धर्मा पाटील यांच्या मुलांनी १५ लाखाचे अनुदान नाकराले

मुंबई | धुळे जिल्ह्यातील होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात धर्मा पाटील यांची शेत जमीन गेली असून त्याच्या जमीनीला योग्य भाव न मिळाल्याने त्यांनी विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता. पाटील यांना १५ लाखाचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली. धर्मा पाटील यांना एक महिन्याच्या आत अनुदान मिळावे असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले. पण, त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील याने हे अनुदान नाकराले आहे. ‘आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी मांडली आहे.’

७० वर्षीय वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाटील यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकल्पात शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन गेली असून सरकारने पाच एकरच्या बदल्यात त्यांना चार लाख रुपये भरपाई देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पण, या प्रकल्पा संबंधित अधिकारी आणि मंत्रालयाकडून योग्य ते उत्तर मिळत नसल्यामुळे विष प्राशन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

तसेच धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत ६०० आंब्याची झाडे आणि विहीर अशी बागायती जमीन प्रकल्पात गेली आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला असून इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत पाटील यांना कमी मोबदला मिळाला असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लागण झाल्यास त्याची व्याप्ती वाढू शकते मात्र घाबरण्याचे कारण नाही !

swarit

नवाब मलिकांची प्रकृती खालावली, उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल

Aprna

राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk